बस स्थानकासमोर बेवारस मृतदेह


दैनिक स्थैर्य । दि. ११ ऑगस्ट २०२२ । सातारा । बसस्थानकासमोर मंगळवारी सायंकाळी पोलिसांना ४० ते ४५ वर्षीय पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला. बसस्थानकासमोरील महसूल भवनच्या गाळ्याच्या शेजारी संबंधित व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली. यानंतर काही नागरिकांनी याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या व्यक्तीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. संबंधित व्यक्तीची ओळख पटली नसून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!