दैनिक स्थैर्य | दि. ०४ जानेवारी २०२५ | फलटण | श्रीराम विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक प्रमोद उर्फ आबा खलाटे व त्यांचे कुटुंबीय माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विकास कामावर प्रेरित होऊन भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. या प्रवेश समारंभात मलठण मधील त्यांचे कुटुंबीय हजर होते.
या प्रवेशासाठी मलठण मधील माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांचे विशेष प्रयत्न करण्यात आले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप मध्ये आबा खलाटे व त्यांच्या कुटुंबीयांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
आबा खलाटे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकास कामांवर प्रेरित होऊन भाजपात प्रवेश केल्याचे सांगितले. त्यांनी या निर्णयामागील प्रेरणा व्यक्त करताना म्हटले की, “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांनी मला व माझ्या कुटुंबियांना प्रभावित केले आहे.”
आबा खलाटे यांच्या भाजपात प्रवेशाने पक्षाची ताकद वाढेल असे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सांगितले. ते म्हणाले, “आबा खलाटे यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांचा सामावेश होण्याने पक्षाची वाटचाल अधिक बळकट होईल.”