दैनिक स्थैर्य | दि. २२ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
फलटण तालुक्याच्या पूर्वभागातील खटकेवस्ती येथील जय तुळजाभवानी मंदिरामध्ये शारदीय नवरत्न उत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते देवीची आरती घेण्यात आली.
यावेळी सरपंच बापूराव गावडे यांनी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. तानाजी पाटील संचालक, श्रीराम सहकारी साखर कारखाना, संतोष खटके, संचालक श्रीराम साखर कारखाना, उपसरपंच लक्ष्मण तात्या दडस, काका खटके, योगेश पाटील, संतोष खटके उपस्थित होते.
जय तुळजाभवानी नवरात्र महोत्सव आयोजक पै. रामभाऊ गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून उत्सव काळात चालणारे उपक्रमांची माहिती दिली. हनुमान माध्यमिक विद्यालय गोखळी, जिल्हा परिषद शाळा खटकेवस्ती, पंचबिघा जिल्हा परिषद शाळेच्या लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दांडिया, दांडी काठी, कराटे प्रात्यक्षिक आदी कार्यक्रमांनी भाविकांचा उत्साह व्दिगुणित झाला. खेळण्याची दुकाने, झोके, पाळणे यासाठी लहान लहान मुलांची दररोज गर्दी होते. देवीच्या दर्शनासाठी फलटण, बारामती, इंदापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातील भाविकांनी गर्दी केली होती.
या उत्सवाची सांगता दसर्याच्या दिवशी छबिना मिरवणूक, होम हवन आदी धार्मिक कार्यक्रमांनी होणार आहे.