दैनिक स्थैर्य । दि. २९ एप्रिल २०२२ । सातारा । महाराष्ट्रामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमती तसेच शेतीविषयक असणारे प्रश्न अशा विविध समस्यांसाठी रस्त्यावर उतरून आम आदमी पक्षातर्फे आंदोलने केली जाणार आहेत कार्यकर्त्यांचे जाळे संपूर्ण महाराष्ट्र आणि सातारा जिल्ह्यात उभे करणार असल्याची ग्वाही आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी दिली.
यावेळी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई खजिनदार सागर भोगावकर प्रदेश सचिव दीपक सिंगला यांनी यावेळी उपस्थित होते. राजुरे पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले, दिल्ली आणि पंजाब या राज्यांमध्ये मिळालेल्या यशानंतर आम आदमी पार्टीने महाराष्ट्राच्या राजकारणावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्र येथे पक्षाने संघटनात्मक पातळीवर बांधणी सुरू केली आहे. सर्वसामान्यांचे जीवनावश्यक प्रश्न आणि इंधन दरवाढ तसेच महागाई या मूलभूत प्रश्नांवर विविध माध्यमातून सनदशीर मार्गाने आंदोलने करून संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांचे जाळे उभे केले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील पुनर्वसनाचे प्रश्न सिंचनाचे प्रश्न याशिवाय विकासाच्या विकासाच्या प्रश्नावर विविध उपाय योजना आणि निधीसाठी पाठपुरावा याकरिता आम आदमी पार्टीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम आदमी पार्टी आपले राजकीय भवितव्य आजमावणार आहे, असे राचुरे यांनी स्पष्ट केले.
सागर भोगावकर पुढे म्हणाले, सातारा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकच्या पार्श्वभूमीवर मेळावे घेत आहे. आतापर्यंत 16 मेळावे झाले आहेत. आम आदमी पक्षाची धेय्य धोरणे तळागाळात पोहोचण्यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न, बेरोजगारी वाढते, सरकारने दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. कोरोना काळात आरोग्य सेवा विस्कळीत झाली होती. जिल्हा परिषद शाळांची अवस्था दयनीय तिथे डुकरांचा वावर अधिक आहे. सेवाभावी साठी जे सरकार आलं आहे पण त्याकडे सध्या दुर्लक्षच आहे अन ही जाणीव होण्यासाठी आम आदमी पक्षाचा प्रयत्न सुरू आहे. 2014 नंतर निवडणूक महाराष्ट्रात लढवल्या नाहीत 2019 मध्ये काही ठिकाणी जागा लढवल्या आहेत.
संदीप देसाई म्हणाले की, गेल्या चार महिन्यापासून सातारा जिल्ह्यात चांगलं काम आहे. जिप पस या साधारणपणे नोव्हेंबरमध्ये निवडणुकीची शक्यता आहे. तोपर्यंत पक्ष बांधनिस वेळ आहे. लोकांनाही परिवर्तन हवं आहे. लोकशाहीत प्रजा अन राजा हा संघर्ष राहणार आहे