स्वच्छ भारत योजनेंतर्गत आदर्की बुद्रुकला तीन चाकी ई घंटागाडी प्राप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 30 डिसेंबर 2024 | फलटण | स्वच्छता ही आरोग्याची मूलभूत गरज आहे, हे सर्वांना माहीत आहे. दैनंदिन जीवनात घर, परिसर व गाव स्वच्छ ठेवल्यास गावात आजाराला शिरकाव मिळणार नाही आणि सर्वांचे आरोग्य सदृढ व तंदुरुस्त राहील. याच ध्येयाने स्वच्छ भारत योजना व घनकचरा व्यवस्थापनांतर्गत आदर्की बुद्रुक ग्रामपंचायतीसाठी शासनाने उपलब्ध केलेली तीन चाकी ई घंटागाडी गावासाठी आरोग्यदायक ठरणार असल्याचे श्री भैरवनाथ उद्योग समूहाचे प्रमुख बाळासाहेब कासार – मोहोळकर यांनी सांगितले.

तीन चाकी ई घंटागाडीमुळे गावातील ओला व सुका कचरा दररोज उचलला जाणार आहे. हे घंटागाडी इलेक्ट्रीक असल्याने इंधन बचत व मेन्टेनन्स यासारख्या गोष्टींचा विचार करून गावाला आधुनिक जगाशी जोडणारा एक धाडसी निर्णय घेतल्याने आदर्की बुद्रुक ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे अनेकांनी कौतुक केले आहे. गावात प्रदुषण होणार नाही याची काळजी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ घेतील, असे त्यांनी सांगितले.

या घंटागाडीच्या लोकार्पण सोहोळ्यात सरपंच गणपतराव धुमाळ व महा डिजिटल मिडिया असोसिएन प्रदेशाध्यक्ष विनायक शिंदे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले. यावेळी श्री भैरवनाथ मल्टीस्टेटचे व्हाईस चेअरमन संजय पवार, संचालक हणमंतराव पवार, माजी सैनिक पोपटराव धुमाळ, दिलीप धुमाळ, हणमंतराव मदने, मोहनराव मोहोळकर, बाळासाहेब शेडगे, सिकंदर आतार, विजयकुमार जाधव, सोमनाथ जाधव, काकडे, तुषार पवार, पाणी पुरवठा कर्मचारी जावेद पठाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!