स्थैर्य, फलटण : फलटण तालुक्यातील आसू येथील तरुण मोशीम काझी याने आपल्या वाढदिवसानिमित्त मित्रांच्या मदतीने आसू गावातील अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना मास्कचे वाटप करून आपला वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा केला. सदरील मास्क वाटप केल्याबद्दल अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांनी काझी यांचे विशेष आभार मानले. कोरोना या महाभयंकर आजारामुळे संपूर्ण जग ग्रासलेले आहे. असे असताना आपण समाजचे काहीतरी देणे लागतो ह्या हेतूने आपल्या वाढदिनी अनावश्यक खर्च टाळून अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका यांना फिल्डवर काम करताना आवश्यक असलेले मास्क देऊन काझी यांनी आपला वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून मास्क वाटप केल्याचा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे मत फलटण पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले. यावेळी सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक प्रमोद झांबरे, आसू ग्रामपंचायतीचे सरपंच महादेवराव सकुंडे, सदस्य जीवन पवार, धनराज घोरपडे, मुन्ना शिरतोडे तसेच राहुल कुंभार, हर्षल डोंबाळे, सागर गोफने, महंमद मुलानी, आरिफ महात, तोशिफ जकाते, आसिफ शेख आदी उपस्थित होते.