उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना दिलेल्या बुकेची विश्व विक्रमी नोंद; तब्बल 1369 गुलाबांचा बनवला बुके

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Channel Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 02 डिसेंबर 2023 | बारामती | इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स, लंडन यांच्या मान्यतेने १८० विश्व विक्रम करणारे १ भारतीय डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांचा 1369 गुलाबांच्या फुलांचा विश्व विक्रमी गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

कर्जत येथील रॅडिसन ब्लू रिसोर्ट मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकारी शिबिरात हा विश्वविक्रमी 1369 गुलाबांच्या फुलांचा गुच्छ डॉ. दीपक हरके यांच्या हस्ते अजित पवार यांना देण्यात आला. याची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स, लंडन मध्ये करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते ताराचंद म्हस्के – पाटील व आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून हा विश्व विक्रमी गुच्छ देण्यात आला. इंटरनॅशनल बुक ऑफ ऑनर अँड रेकॉर्ड्स लंडनचे चेअरमन डॉ. दिवाकर सुकूल हे पुढील आठवड्यात लंडनहून मुंबईत येऊन या विश्व विक्रमचे प्रमाणपत्र उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना देणार आहेत.

डॉ. दीपक हरके यांच्या संकल्पनेतून अहमदनगरच्या शुभ फ्लॉवर्स अँड डेकोरेटर्स ने हा विश्व विक्रमी गुच्छ बनविला आहे.


Back to top button
Don`t copy text!