दैनिक स्थैर्य । दि.२७ जानेवारी २०२२ । फलटण । जागृत स्पंदनाचा संपूर्ण सृष्टीवर सकारात्मक परिणाम होत असतो. अश्या या उत्तरायणाच्या कालावधीत किरणोत्सवाचा अद्भुत चमत्कार श्री दत्त मंदिर मोर्वे येथे पाहण्यास मिळत आहे. दत्तप्रभूंवर सूर्योदयानंतर मूर्तीवर किरणे पडत असतात सूर्यकिरणांच्या दिव्य तेजाने मूर्ती उजळून निघाली सूर्यनारायणाला सुवाशिनेने ओवाळून व प्रसाद वाटपाने किरणोत्साराची सांगता झाली.
सूर्य हे तेज तत्वाचे प्रकट रूप मानले जाते. दत्त महाराज हे सगुण तत्त्वांची जागृती करणारे तत्त्व आहे. जेव्हा जेव्हा हा सूर्यनारायण आपल्या किरणांनी तेज फाकतो तेव्हा ती मूर्ती प्रचंड तेजाने उजळून निघते या क्रियेला किरणोत्सव म्हटले जाते. आपल्या धर्म शास्त्रात हे वर्णन आले आहे. या काळात या दोन्ही तत्त्वांचे म्हणजे तेजाचे आणि सुगुन रूपाचे मिलन होते ह्या वेळेस त्या अद्भूत अशा मूर्तीतून चैतन्य रुपी जागृत लहरी ब्रह्मांडामध्ये प्रक्षेपित होत असतात. ह्या लहरी ही स्पंदने वातावरणातील वाईट असुरी शक्तींचा नाश करतात. असे धर्मशास्त्रात सांगितले आहे.