दैनिक स्थैर्य | दि. १४ ऑक्टोबर २०२१ | पुसेगाव | पुसेगाव येथे बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भरघाव ट्रकने मोटार सायकलला पाठीमागून दिलेल्या जोरदार धडकेमुळे झालेल्या अपघातात मोटारसायकल चालक गंभीर जखमी तर चालकाची पत्नी जागेवर ठार झाली.
याबाबत पुसेगाव पोलिसांनी सांगितले, आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पुसेगाव – सातारा रस्त्यालगत असलेल्या सेवागिरी द्रोण पत्रावळी पूजा साहित्याच्या दुकानासमोर विशाल अनिल मोरे (वय 22, राहणार- आकाशवाणी झोपडपट्टी सातारा ) हे आपली पत्नी पूजा ( वय 19 ) यांच्यासह मोटारसायकलवरुन साताऱ्याकडे चालले होते. त्याचवेळी आयुब नुरमहंमद भालदार राहणार करंजेनाका सातारा हा ट्रक घेऊन साताऱ्याकडे चालला होता. या भरधाव ट्रकने विशाल मोरे यांच्या मोटरसायकलला पाठीमागून जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात विशाल यांची पत्नी पूजा या ठार झाल्या तर विशाल मोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची फिर्याद लखन भिमराव मोरे ( वय 32, राहणार आकाशवाणी झोपडपट्टी सातारा ) यांनी पुसेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिस नाईक व्ही. एम. भोसले घटनेचा तपास करत आहेत