गुंगीचा पदार्थ खाण्यास देऊन बसमधील महिलेचे दागिने लांबविले; फलटण बसस्थानकातील घटना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२४ | फलटण |
औरंगाबाद ते सांगली जाणार्‍या एस. टी. बसमधून प्रवास करताना सौ. उषा मदन बागवडे (वय ४७, रा. बुध, ता. खटाव) यांना गुंगीचा पदार्थ खाण्यास देऊन चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र व बोटातील अंगठी लंपास केल्याची घटना घडली आहे. उषा बागवडे या फलटण बसस्थानकात उतरल्यानंतर त्यांना आपल्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे समजले.

या चोरी प्रकरणी सौ. उषा बागवडे यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून चोरट्याने सुमारे ९०,००० रुपये किमतीचे २१ ग्रॅम वजनाचे त्यांचे मनीमंगळसूत्र व१२,००० रुपये किमतीची चार ग्रॅम वजनाची लाल खडा असलेली सोन्याची अंगठी, असे एकूण १,०२,००० रुपयांचे दागिने लंपास केले आहेत.

या चोरीचा अधिक तपास सहा. फौजदार अनिल भोसले करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!