जमिनीच्या वादातून पिंप्रदमध्ये पारधी समाजातील महिलेला झोपडीसह जाळले; जळीत महिलेचा जागीच मृत्यू

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण दि.11 : पिंप्रद, ता.फलटण येथे जमिनीच्या वादातून पारधी समाजातील महिलेला वादग्रस्त जागेतील झोपडीसह जाळल्याचा भिषण प्रकार घडला असून यामध्ये संबंधीत जळीत महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत सौ.कल्पना अशोक पवार (वय 45, रा.अलगुडेवाडी, ता.फलटण) यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीजबाबानुसार; फिर्यादी महिलेचे सासरे झबझब पवार यांनी सुमारे 25 ते 30 वर्षांपूर्वी पिंप्रद, ता.फलटण येथे प्रल्हाद गोरख मोरे यांची गट नं.3 मधील 25 गुंठे जमीन खरेदी केली होती. मात्र सदरच्या जमिन प्रल्हाद मोरे व त्यांचे नातेवाईक फिर्यादीच्या कुटूंबाला वहिवाटू देत नसल्याने प्रल्हाद मोरे यांचा मुलगा राजू प्रल्हाद मोरे याच्यासोबत जमिनीवरुन वादविवाद होता. जमिन वहिवाटीसाठी 1 वर्षापूर्वी मोजणी आणून मोजणीनंतर संबंधीत जमीनीमध्ये झोपडी टाकण्यात आली होती. मात्र ती जमीन पिंप्रद येथील कुंडलिक कृष्णा भगत, सतिष भगत व राजु प्रल्हाद मोरे, कुमार मोरे यांनी पाडून टाकली होती. दि.10/2/2021 रोजी दुपारी 1:30 चे सुमारास फिर्यादी सौ.कल्पना पवार आपली मुलगी रोशनी, काजल, सून मातेश्री, नणंद महुली उर्फ मौली हे संबंधीत जागेत गेले आणि त्यांनी पुन्हा झोपडी उभारली व त्याच ठिकाणी स्वयंपाक करुन त्यांनी रात्रीचे जेवणखाण केले. रात्री 11 च्या सुमारास कुंडलिक कृष्णा भगत, सतिश भगत, राजु प्रल्हाद मोरे, कुमार मच्छिंद्र मोरे व सुनिल मोरे या पाच जणांनी हातात दांडगे घेवून फिर्यादी व सोबतच्या कुटूंबियांवर अचानक हल्ला चढवला. त्यावेळी फिर्यादीची नणंद महुली उर्फ मौली या झोपडीमध्ये झोपलेल्या होत्या. सदर आरोपींनी यावेळी झोपडी पेटवून दिली आणि त्यामध्ये झोपडीत झोपलेल्या महुली उर्फ मौली या भाजून त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपींनी फिर्यादी सौ.कल्पना पवार, सूत मातेश्री यांनाही मारहाण करुन जखमी केले असून झोपडी पेटवून देवून झोपडीमधील झोपलेली नणंत महुली उर्फ मौली झबझब पवार हिचा या पाच आरोपींना खून केला आहे, अशी तक्रार फिर्यादीनी आपल्या जबाबात केली आहे.


Back to top button
Don`t copy text!