स्थैर्य, वाई, दि.०७: कासवंड (ता. महाबळेश्वर) येथे धनदांडग्यांची शासनाचे नियम तोडून लग्नाची पार्टी केल्याप्रकरणी पांचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील कासवंड गावच्या हद्दितील एक बंगला भाड्याने दिल्या प्रकरणी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बंगल्यावर लग्नाची पार्टी झाली . रात्री पोलिसांनी या ठिकाणी जावून पंचनामा करण्यात आला आहे.
भिलार पासून जवळच असणाऱ्या कासवंड गावच्या हद्दीत रात्री व हमीद हाऊस कासवंड (ता महाबळेश्वर) या ठिकाणी आरोपी सागर श्रीकांत तराळ यांनी संपूर्ण जिल्ह्यात जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू असताना आपल्या ताब्यातील बंगला लोकांना भाड्याने राहण्यास दिला, तसेच करोना आजाराच्या अनुषंगाने शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन न करता गर्दी जमवली या प्रकरणी तराळ यांचेवर पांचगणी पोलिस ठाण्यात सहाय्यक पोलीस फौजदार अरविंद श्रीरंग माने यांनी गुन्हा दाखल केला आहें.
हमिदा हाऊस या बंगल्यात शासनाचे टाळेबंदीचे कडक नियम असतानाही शेकडो लोक बाहेरून येवून राजरोसपणे या ठिकाणी लग्नाची पार्टी चालु असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. काही ग्रामस्थांनी या ठिकाणी जावून पाहणी केली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार चालू असताना काही ग्रामस्थ या ठिकाणी धडकले.
जमाव बंदी व जिल्हा बंदी असताना शासनाचे आदेश धुडकावत हे लोक या ठिकाणी आलेच कसे हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. प्रशासनाचा कडक टाळेबंदी असताना बाहेरून या ठिकाणी येण्याचे धाडस करताना करोना प्रसार करण्यासाठी ही गोष्ट पूरक वाटत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
या पार्टीत कुणाच्याही तोंडावर मुखपट्टी नव्हती तसेच मद्यधुंद पणे नाचत होते असे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. अनेक गावांनी करोना प्रदुर्भावापसुंरोखण्यासाठी गावबंदी केली आहे. गावांच्या सीमा बंद करीत आहेत गावात बाहेरून कुणालाही प्रवेश नाही बंदी आहे असे असताना मुंबई पुण्याहून हे लोक आलेच कसे, कुणाच्या परवानगी आले अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
याप्रकरणाचा अधिक तपास पाचगणीचे सपोनि सतिश पवार व त्यांचे सहकारी करीत आहेत.