दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२३ | फलटण |
मलवडी (ता. फलटण) येथे विषारी मण्यार (common krait (Bungarus caeruleus) जातीच्या सापाने विषारी घोणस Russell’s viper(Daboia russelii) जातीच्या सापाला खातानाचा क्षण लोकवसाहतीजवळ Nature & Wildlife Welfare Society, Phaltan चे सदस्य किरण रिटे, धीरज भोसले, गणेश धुमाळ, साकेत अहिवळे, सागर धंगेकर, श्रीनिवास भुजबळ व निखील जाधव यांनी पाहिला. हा क्षण दुर्मिळ असल्याचे यावेळी ‘नेचर अॅण्ड वाईल्डलाईफ वेलफेअर सोसायटी फलटण’च्या प्रतिनिधींनी सांगितले.
यावेळी माहिती देताना ते म्हणाले की, विषारी मण्यार साप हा इतर साप, उंदीर, सापसुरूळी तसेच स्वजातीचे लहान मण्यार साप खाऊन निसर्गाचा समतोल राखणारा साप म्हणून प्रसिद्ध आहे, असे सांगितले. मलवडी परिसरामध्ये विषारी घोणस सापाला खाताना मण्यार साप आढळला गेला, हा अत्यंत दुर्मिळ क्षण आहे आणि हे सहसा पहायला मिळणे क्वचितच घडते. संस्थेच्या सदस्यांनी ह्या क्षणाचे छायाचित्रीकरण केले व त्याचे भक्ष पूर्ण गिळल्यानंतर सुरक्षितरित्या फलटण विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. व्ही. जाधव, वनपाल आर. एस. आवारे, वनरक्षक भोये बी. आर. यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी वस्तीपासून दूर निसर्गात मुक्त केले.