दैनिक स्थैर्य | दि. २७ जानेवारी २०२४ | फलटण |
१९४१ साली सुरू झालेली व शेती महामंडळ हद्दीत सुरू असणारी जि. प. शाळा राजाळा सर्कल (सोनगाव बंगला) ची जुनी इमारत शेवटच्या घटका मोजत होती. शेती महामंडळ हद्दीत असल्याकारणाने बांधकाम व दुरूस्तीसाठी अनुदान मिळत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. खूप वर्षांपासून ही शाळा अस्तित्वात असल्यामुळे बरेच विद्यार्थी यातून बाहेर पडले आहेत. त्यामुळे ही शाळा आत्मीयतेचा विषय बनली आहे.
ही शाळा पुनर्जीवित करण्यासाठी सोनगावमधील तरुणांनी पुढाकार घेतला आणि त्यातूनच ठरलं की शाळेची डागडुजी, रंगकाम आणि कुंपण शाळेला करायचं. त्यासाठी देणगी उभी करू. त्याप्रमाणे पूर्ण शाळेचे अंदाजे दीड लाख रुपये किमतीचे रंगकाम गावातीलच फौजी पोलीस मित्र संघटनेने निधी उभा केला आणि २६ जानेवारीपूर्वी काम पूर्णत्वास नेले आणि ७५ व्या प्रजासत्ताक दिनी ही अनोखी भेट गावाला दिली. शाळेच्या कुंपणासाठी सुद्धा गावातील काही तरुणांनी निधी उभारलांय, लवकरच ते कामही पूर्णत्वास जाईल. यामध्ये आजी – माजी फौजी, पोलीस, शिक्षक आणि सर्व तरुण मंडळ यांचा समावेश आहे.
शाळेच्या या बदलामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये फौजी पोलीस मित्र संघटनेमधील नानासो पिंगळे, दयानंद पिंगळे, सतीश पिंगळे, रामहरी पिंगळे, सुधाकर लेंबे, संदीप ढवळे, विजय गोरवे, दीपक सोनवलकर, सुजित शेलार, स्वप्निल वाघ, संतोष शिंदे, राहुल मोरे, योगेश कुंभार, अजित पिंगळे, अविनाश पिंगळे, हनुमंत पिंगळे, अमोल वाणी हे सर्व आजी-माजी फौजी व पोलीस सहभागी होते. तसेच सर्व तरुण मंडळामधील प्रा. राजेश निकाळजे, संतोष गोरवे, गणेश कांबळे, नानासो धायगुडे सर, धनाजी मोरे सर, अशोक भोसले, निळकंठ निंबाळकर सर, प्रवीण निंबाळकर सर, पोपटराव बुरुंगले, राजेंद्र आडके, श्रीमंत निंबाळकर, शशिकांत मोरे, धर्मराज लांडगे, मल्हारी तोरणे, चंद्रकांत महादेव निकाळजे, दिलीप हनुमंत कांबळे, सुरेश हनुमंत कांबळे, मारुती रिटे, बाबासो लवटे, दीपक लांडगे, सचिन लांडगे व इतर सर्वजण सहभागी झाले आहेत.
ग्रामस्थांकडून शाळेत झालेला बदल पाहून सर्वांचे कौतुक होत आहे.