दैनिक स्थैर्य | दि. ३ जुलै २०२४ | फलटण |
१ जुलै जागतिक ‘डॉक्टर्स दिना’चे औचित्य साधून भवानी माता मंदीर परिसर, दुधेबावी, ता. फलटण, जि. सातारा येथे ‘नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी’, फलटण यांच्या विद्यमाने डोंगर परिसरातील स्थानिक देशी झाडांचे वृक्षारोपण इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स, फलटण डॉक्टर्स असोसिएशन, आकांशा क्लासेस फलटणचे शिक्षक आणि विद्यार्थी तसेच वृक्षमित्र सचिन सोनवलकर यांच्या सहभागातून करण्यात आले.
नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटणच्या वतीने माहिती देताना सांगण्यात आले की, हे वृक्षारोपण स्थानिक व निसर्गाला पूरक अशा झाडांच्या बियांचे संकलन करुन, त्यांचे रोपे बनवून त्यांचे अशा परिसरात रोपण केली की त्या रोपांचे नैसर्गिक वास्तव्य आणि पर्यावरणाचा समतोल राखला जाईल. यामध्ये संस्थेतर्फे वृक्षप्रेमींना आवाहन करण्यात आले आहे की, प्रामुख्याने स्थानिक देशी व निसर्गाला पूरक अशा वृक्षांचेच वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात यावे. अशा स्थानिक देशी झाडांचे वृक्षारोपण व संवर्धन जे वृक्षप्रेमी करू इच्छितात त्यांनी संस्थेशी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
संपर्क क्र. – ७५८८५३२०२३