दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । फलटण । रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या नात्यातील पवित्र दिवस मानला जातो. रक्षाबंधना दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधत भावाने कठीण प्रसंगी आपल्या रक्षणासाठी धावुन यावे याचं अभिवचन मागत असते. तसेच आपल्या भावाला सुद्धा संकटांपासुन दुर ठेवण्याची भावना देवाकडे मागत मनात जपत हा रक्षाबंधन साजरा केला जातो. सातारा जिल्ह्यातील फलटण मध्ये सुद्धा अनोखं रक्षाबंधन साजरं करण्यात आलं अनेक महिलांनी मिळुन माजी नगरसेवक भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अनुप शहा यांना राख्या बांधत रक्षाबंधन साजरा केला. यावेळी अनुप शहा यांनी महिलांना भेटवस्तु देत सोबत एक भारताचा तिरंगा देवुन अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केलाय. अनुप शहा हे कायम फलटण शहरातील महिलांच्या सामाजिक समस्यांवर आवाज उठवत आले आहेत. शहरातील आणि वाॅर्ड मधील महिलांच्या संकटात धावुन जाण्याचं काम अनुप शहांनी वेळोवेळी केल्यामुळ त्यांना रक्षा बांधण्यासाठी दरवर्षी शेकडो महिलांची भगिणींची गर्दी त्यांच्या घरात पहायला मिळते. याच प्रमाणे यावर्षी सुद्धा अनुप शहा यांना शेकडो महिलांनी राख्या बांधल्या.