स्थैर्य, फलटण, दि. ६ :होळ, ता. फलटण येथील मयत पाॅसिटीव्ह महिलेच्या संपर्कातील ७ व्यक्तींच्या करोना चाचणीचा अहवाल पाॅसिटीव्ह आलेल्या आहेत. त्याच बरोबर तांबवे, ता. फलटण येथील मयत पाॅसिटीव्ह पुरुषाच्या संपर्कातील ६ व्यक्तींच्या करोना चाचणीचा अहवाल पाॅसिटीव्ह आलेला आहे. चेंबूर, मुंबई येथून कोळकी, ता. फलटण येथे दि २४ मे २०२० रोजी कुटुंबासह आलेल्या एका ५० वर्षीय महिलेचा व एका २५ वर्षीय तरुणाचा कोविड म्हणजेच करोना अहवाल पाॅसिटीव्ह आला आहे. यापूर्वीच याच कुटुंबातील एका पुरुषाचा अहवाल पाॅसिटीव्ह आला होता, सदरील दोघे हे पूर्वीच्या कोव्हीड ग्रस्ताच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील होते. त्या सोबतच मुंबई परिसरातून मौजे जोर (वाखरी) येथे आलेल्या एका १२ वर्षीय मुलाची कोविड चाचणी पाॅसिटीव्ह आली आहे. तसेच हाय रिस्क कॉन्टॅक्ट मधील शेजारील घरातील (कोपरखैरणे वरुन आलेले) एका २५ वर्षीय मुलीचा व २१ वर्षीय मुलाचा कोव्हीड अहवाल पाॅसिटीव्ह आले आहेत. २ जून २०२० रोजी घेतलेल्या ३० जणांच्या चाचण्यांपैकी २३ जणांच्या चाचण्या निगेटीव्ह आल्या असून उपरोक्तप्रमाणे आज एकूण १८ जणांचे रिपोर्ट आज पाॅसिटीव्ह आहेत. काल अखेर करोना बाधित असलेले एकूण २७ रुग्ण फलटण तालुक्यात आहेत. त्या सोबत तालुक्यात ह्या पूर्वी एकूण ९ रुग्ण करोना पासून बरे झाले असून तालुक्यात ४ जणांचा करोना मुळे मृत्यू झाला असल्याची माहिती फलटण उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.