स्थैर्य, फलटण, दि. ४ : फलटण तालुक्यामध्ये काल (दि. ३ जून) अखेर करोना म्हणजेच कोव्हीड १९ या आजाराचे एकूण २२ रुग्ण आढळले आहेत. त्या मधील चौघांचा मृत्यू झाला आहे तर ९ जण करोना मुक्त झालेले आहेत. काल (दि. ३ जून) अखेर करोना म्हणजेच कोव्हीड १९ चे ९ रुग्ण असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजी जगताप यांनी दिली.
काल (दि. ३ जून) अखेर 2793 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत. त्यांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला नाही. फलटण येथील करोना केअर सेंटर मधील कन्फर्म वार्ड मध्ये १ रुग्ण असून सस्पेक्ट वार्ड मध्ये ८२ जण आहेत. काल (दि. ३ जून) रोजी ४ अहवाल प्राप्त झाले असून १ पॉसिटीव्ह व ३ निगेटिव्ह आला असल्याचेही डॉ. जगताप यांनी स्पष्ट केले.