१२७८ गाय व १५७ बैल असे एकूण १४३४ जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव एकूण ३००४४ पशुधनाचे लसीकरण पुर्ण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ सप्टेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात फलटण, सातारा, खटाव, कराड, पाटण, कोरेगाव, माण, खंडाळा, जावली व वाई  असे 10 तालुक्यातील 100 गावांमध्ये लंम्पी चर्म रोगाची लागण झाली आहे. आज अखेर गाय 1278 व 157 बैल असे एकूण 1434 जनावरांस लंम्पी रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. तसेच आज दिनांक 28/9/22  रोजी जिल्हयामध्ये 8 जनावरांचा मृत्यु झाला असून (आजअखेर 72 गायी + 19 बैल असे एकूण 91 पशुधन मृत झाले आहे. आजअखेर 196 गाई व 20 बैल असे एकूण 216 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. अंकुश परिहार यांनी दिली आहे.

लंम्पी चर्म रोग उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकीत्सालायांमध्ये उपलब्ध आहेत. आजमितीस सातारा जिल्ह्याकडे 3,11,900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून यांमधुन आजअखेर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित गाव व  बाधित गावाचे ५ किमी परिघातील एकूण 628 गावांमधील गोवर्गीय  174487 व  इतर अबाधित क्षेत्रातील गावांमधील गोवर्गीय  125557 असे एकूण 300044 पशुधनाचे लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे.

लंपी चर्म रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण 85 टक्के पुर्ण झाले आहे.

लंम्पी चर्म रोग औषधोपचाराने बरा होत असल्याने पशुपालकांनी रोग प्रादुर्भावाची लक्षणे आढळून आल्यास त्यांची माहिती तात्काळ नजीकच्या पशुवैदयकीय दवाखान्यात अथवा पशुसंवर्धन विभागाच्या टोल फ्री क्र.18002330418 अथवा राज्यस्तरीय कॉल सेंटर मधील पशुसेवेचा टोल फ्री क्र. 1962 यावर तात्काळ संपर्क साधावा.

जिल्हयामध्ये खाजगी पशुवैद्दकीय सेवादाते यांचेमार्फतही लंपी चर्म रोगाचे लसीकरण करणेबाबत मा. जिल्हाधिकारी यांनी आदेश पारित केले असुन सर्व निरोगी पशुधनास लसीकरणाचे कामकाज वेगाने करण्यात येत आहे.


Back to top button
Don`t copy text!