स्थैर्य, कराड, दि.१२: कराड सातारा रेल्वे मार्गावर कोपर्डे हवेली (ता. कराड) येथील रेल्वे गेट नजीक बुधवारी दुपारी भीषण रेल्वे दुर्घटना टळली. रेल्वे गेट पार करत असतानाच ऊस वाहतूक करणार्या बैलगाडीचे चाक अचानक तुटले. त्याचवेळी कराड (ओगलेवाडी) रेल्वे स्टेशनवरून सातार्याच्या दिशेने भरधाव वेगात निघालेली रेल्वे अर्धा किलोमीटरवर आली होती. मात्र, प्रसंगावधान राखत शेतकर्यांनी लाल झेंडे दाखवून रेल्वे अडवल्याने शेकडो नागरिकांचे प्राण वाचले.
बुधवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास खासदार श्रीनिवास पाटील यांच्या निवासस्थानी कोरेगाव तालुक्यातील शेतकर्यांची रेल्वे भुयारी मार्गाबाबत बैठक होती. ही बैठक अटोपून विकास थोरात यांच्यासह शेतकरी मसूरमार्गे कोरेगावकडे निघाले होते. शेतकरी कोपर्डे हवेली येथील रेल्वे गेटजवळ आले असता अचानक एका ऊस वाहतूक करणार्या बैलगाडीचे चाक तुटले आणि बैलगाडी रेल्वे रूळावरच मध्यभागी अडकली.
त्याचवेळी रेल्वे गेटमन अजमैर – म्हैसून ही रेल्वे आल्याने बैलगाडी पुढे घेण्यास सांगत होते. विरूद्ध बाजूचे चाक तुटले असल्याने रेल्वे गेटमनच्या हा प्रकार लक्षात आला नाही. पाठीमागे असणार्या विकास थोरात यांच्यासह शेतकर्यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर ते सर्वजण धावत गेटमनच्या दिशेने पळाले. त्यांनी गेटमनला प्रकार सांगत लाल झेंडे घेत रेल्वे रूळावरून कराडच्या दिशेने पळ काढला. तोपर्यंत रेल्वे चारशे मीटर अंतरावर आली होती. विकास थोरात, जयसिंग जाधव, अजय बापू कदम, सुरज कदम, अमोल पाटील, विकास पाटील शेतकर्यांच्या हातातील झेंडे पाहून रेल्वेचा वेग कमी करण्यात आला आणि अखेर रेल्वे फक्त शंभर फूट अंतरावर येऊन थांबली.
त्यानंतर शेजारील वीजभट्टीवर असणार्या टॅ्रक्टरच्या फलटणात रस्त्यासाठी सर्वपक्षीय रस्त्यावर; खासदार निंबाळकरांचा उपोषणाला पाठिंबामदतीने रूळावर अडकलेली बैलगाडी बाहेर ओढण्यात आली. त्यानंतर अवघ्या दहा मिनिटात रेल्वे त्या ठिकाणाहून सातार्याच्या दिशेने निघून गेली. त्यामुळेच शेतकर्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे बुधवारी दुपारी शेकडो नागरिकांचे प्राण वाचले आहेत.