दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । मुंबई । एमजी मोटर इंडियाने लवकरच लॉन्च करण्यात येणा-या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचा आणखी एका टिझर सादर केला. ‘सिम्फनी ऑफ लक्झरी’ म्हणून संकल्पना करण्यात आलेल्या नेक्स्ट-जनरेशन हेक्टरचे इंटीरिअर सिनेमॅटिक व सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये हस्तनिर्मित रचना, सॉफ्ट-टच टॅक्टाइल आणि मागणीदायी वैविध्यपूर्ण वातावरणाचा समावेश आहे.
ड्युअल टोन ओक व्हाइट अॅण्ड ब्लॅक इंटीरिअरसह संपन्न ब्रश्ड मेटल फिनिश नेक्स्ट-जनरेशन हेक्टरच्या केबिनमध्ये आलिशान सुविधांचा अनुभव मिळण्याची खात्री देतात, जे कॉकपीट-सारख्या कंसोलमधून वाढवण्यात आले आहे. तसेच लेदर कव्हरिंगसह नवीन इन्स्ट्रूमेंट पॅनेल आडव्या लाइन्ससह डिझाइन करण्यात आले आहे आणि डोअर पॅनेलपर्यंत जात विंग्सपॅनच्या भोवती फ्रण्ट केबिन जागा आहे. एसी वेण्ट्सवरील क्रोम ट्रिम नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये देण्यात आलेल्या उच्चस्तरीय लक्झरीमध्ये अधिक वाढ करते.
इंटेलिजण्ट व वैयक्तिकृत इंटरअॅक्शन देण्यासाठी भारतातील सर्वात मोठ्या १४ इंच एचडी पोर्ट्रेट इन्फोटेन्मेंट सिस्टिमला नेक्स्ट-जनरेशन आय-स्मार्ट तंत्रज्ञानाचे पाठबळ आहे, जे प्रतिसादात्मक, अचूक व एकसंधी अनुभव देण्याचे वचन देतात. तंत्रज्ञान व लक्झरीअस इंटीरिअरच्या एकसंधी संयोजनाची खात्री देत नेक्स्ट-जनरेशन हेक्टरमध्ये अतिरिक्त सोयीसुविधेसाठी वायरलेस अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कार प्ले देखील असेल आणि फुल डिजिटल ७ इंच कॉन्फिग्युरेबल क्लस्टर व्यापक फिल्ड ऑफ व्हिजन व सर्वोत्तम व्हर्च्युअल डिस्प्ले देते.