दैनिक स्थैर्य । दि. ०७ सप्टेंबर २०२२ । फलटण । संगणकीय युगात ज्ञान हे सतत बदलत आहे त्यामुळे शिक्षकांना सातत्याने अपडेट राहून विद्यार्थ्यांना शिकवावे लागते शिक्षकांच्या कामा एवढे कोणतेही काम पुण्याचे नाही “शिक्षक हा स्वतः राजा नसून तो राजा घडवू शकतो” एवढी क्षमता शिक्षकांच्या मध्ये असते म्हणून समाजामधील मानवाच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान उच्च दर्जाचे असल्याचे प्रतिपादन सातारा जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी खंदारे यांनी केले आहे.
जय भवानी एज्युकेशन सोसायटी गिरवी या संस्थेच्या वतीने फलटण येथील महाराजा मंगल कार्यालय येथे “५ सप्टेंबर” शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी रविंद्र खंदारे बोलत होते.
यावेळी जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तथा युवा नेते सह्याद्री भैया चिमणराव कदम, फलटण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ शाहिन पठाण तसेच समन्वयक सौ. दमयंती कुंभार मॅडम इ. मान्यंवर या प्रसंगी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना रविंद्र खंदारे म्हणाले की, शिक्षकांमध्ये आईची ममता, वडिलांचा धाक, बहिणीची माया, भावाची सह्रदयता, आणि मित्राचे प्रेम असे सर्व गुण असणारा एकमेव घटक म्हणजे शिक्षक होय. शिक्षकांनी केलेल्या कामाचा गौरव व्हावा म्हणून त्यांचा आजच्या दिनी सत्कार केला जातो. खऱ्या अर्थाने राष्ट्र उभारणीचे काम शिक्षकाच्या हातून होत असते म्हणून भूदान चळवळीचे प्रणेते “विनोबा भावे” म्हणतात की शिक्षक हा “सामाजिक अभियंता” आहे.
शिक्षकाच्या हातून समाज घडवण्याचे काम होत असते शाळेमध्ये आपण जे विद्यार्थी सर्व गुण संपन्न घडवीत असतो त्याचेच प्रतिबिंब समाजामध्ये उमटताना दिसते असे सांगून खंदारे म्हणतात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नीट वाचावे, घडवावे एक विद्यार्थी घडला तर संपूर्ण त्याचे कुटुंब घडते, समाज घडतो, राज्य घडते व देश घडत असतो म्हणून असे म्हटले जाते की शिक्षक हा पूर्वगामी विकास करण्याचे साधन आहे. शिक्षकाचे समाजामधील महत्त्व सांगावयाचे म्हटले तर भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी आपल्या पदग्रहण समारंभाला आपल्या शिक्षकाला बरोबर नेहले होते. नुकतेच एक महिन्यापूर्वी आपल्या भारताच्या सरन्यायाधीशपती महाराष्ट्राचे सुपूर्त लळीत यांची नेमणूक झाली त्यांनी देखील आपल्या पदग्रहण समारंभाला आपल्या शिक्षकाला बरोबर नेले होते यावरून शिक्षकाचे समाजामध्ये स्थान खूप मोठे असल्याचे स्पष्ट होते असे हि, शेवटी खंदारे यांनी सांगितले.
यावेळी जय भवानी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सह्याद्री कदम आपल्या भाषणात म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या जीवनावर सतत शिक्षकांचा प्रभाव असतो म्हणून विद्यार्थी घडवित असताना शिक्षकाचे काम खूप मोठे असून शिक्षकांच्या हातून चांगली समाज पिढी घडावी व शिक्षकांच्या कामाचे कौतुक व्हावे व त्यांना अशा सत्कारापासून प्रोत्साहन व प्रेरणा मिळावी या उदात्त हेतून तसेच शिक्षकांच्या प्रती आदराची भावना व्यक्त करणे याच प्रमुख उद्देशाने आजचा “शिक्षक दिनाचा” कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे सह्याद्री भैया कदम यांनी सांगितले.
यावेळी जय भवानी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने फलटण तालुक्यातील प्राथमिक विभागाच्या जवळपास २२ शिक्षकांचा व माध्यमिक विभागाच्या ९ शिक्षकांचा शाल, श्रीफळ व सन्मानपत्र देऊनआदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान करण्यात आला.