दैनिक स्थैर्य | दि. १७ डिसेंबर २०२४ | फलटण |
राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सोमवारपासून सुरू झाले आहे. या अधिवेशनासाठी सोमवारी कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील हे विधानभवनात दाखल झाले आहेत.
राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शोक प्रस्ताव असल्यामुळे कोणत्याच मुद्द्यावर चर्चा झाली नाही. मात्र, विधान परिषदेमध्ये बीड येथील हत्येप्रकरणी तसेच विधानसभेमध्ये परभणी येथील घटनेवर विरोधकांनी मुद्दा उपस्थित केला. या दोन्ही मुद्द्यावर सरकारी पक्षाच्या वतीने चर्चेची तयारी दाखवण्यात आली आहे.