
दैनिक स्थैर्य | दि. १ ऑगस्ट २०२४ | फलटण |
फलटणमध्ये नागपंचमी हा सण पारंपरिक व सांस्कृतिक पध्दतीने मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, पण काही हौशी लोक बंदी असलेल्या चायनीज/नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवितात. ज्यामुळे गेल्या काही वर्षांमधे हजारो पशूपक्षांना व माणसांना गंभीर दुखापतींना आणि काहींना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. अशातच या दिवशी परंपरांगत रुढींना धरून काही लोक वन्यजीव शिकार यासारखे बेकायदेशीर कृत्य करतात.
अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी नेचर अँड वाईल्डलाईफ वेल्फेअर सोसायटी फलटण या संस्थेद्वारे याबाबत संबंधित प्रत्येक प्रशासकीय खात्यांना कठोर कार्यवाही करण्यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी फलटण या संस्थेतर्फे सर्व नागरिकांना विनंती करण्यात येते की, अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी न होता पारंपरिक व सांस्कृतिक पध्दतीने सण साजरा करून या दिवसाचे पावित्र्य ठेवा.
दरम्यान, चायनीज मांजाच्या विरोधात संस्थेतर्फे दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८ वाजता मुधोजी हायस्कूल येथून रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

