
दैनिक स्थैर्य । दि. २३ ऑक्टोबर २०२२ । फलटण । स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या फलटण शाखेमार्फत आपल्या विविध मागण्यांसाठी तहसीलदारांना नुकतेच निवेदन देण्यात आले.
या निवेदनात शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. मागील हंगामात गाळप झालेल्या उसाची एफआरपीप्रमाणे रुपये दोनशेप्रमाणे रक्कम त्वरित देण्यात यावी. या हंगामातील उसाची एफआरपीप्रमाणे रुपये साडेतीनशे प्रमाणे रक्कम शेतकर्यांना एक हप्त्यात देण्यात यावी. तालुक्यातील साखर कारखान्यांनी या वर्षीचा दर जाहीर करावा. शेतकर्यांच्या पावसाने नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई त्वरित देण्यात यावी. साखर कारखान्यांनी वजनकाटे ऑनलाईन करण्यात यावेत. शेतकर्यांना बारा तास वीज देण्यात यावी. अशा मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे.
या निवेदनावर स्वाभिमानी संघटनेचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, जिल्हा सरचिटणीस रविंद्र घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन यादव, पक्ष तालुकाध्यक्ष दादा जाधव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, पक्ष उपाध्यक्ष शकील सिकंदर मणेर, सोमंथळी शाखाध्यक्ष बाळासाहेब शिपकुले, प्रल्हाद अहिवळे, शिवाजी सोडमिसे, किसन शिंदे यांच्या सह्या आहेत.