राकुसलेवाडी येथील जवानाचे हृदयविकाराने निधन


स्थैर्य, सातारा, दि. 26 : राकुसलेवाडी (ता. सातारा) येथील जवान संतोष रामचंद्र मोरे यांचे २४ मे रोजी सकाळी लुधियाना, पंजाब येथे हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्यावर सोमवारी रात्री उशिरा राकुसलेवाडी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

केद्रिय राखीव पोलीस बल लुधियाना, पंजाब येथील युनिट ई २४५ बटालीयन (सीआरपीएफ) येथे जवान संतोष मोरे सेवा बजावत होते. रविवारी सकाळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला.उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. जवान संतोष मोरे यांनी २० वर्षे ७ महिने सीआरपीएफ मध्ये सेवा बजावली आहे.

जवान मोरे यांचे ४ थी पर्यत राकुसलेवाडीतील प्राथमिक शाळेत तर १० वि पर्यंतचे शिक्षण आसनगाव येथील पंचक्रोशी विद्यालयात झाले होते. त्यांच्या पाश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, दोन विवाहित बहिणी असा परीवार आहे. रात्री उशीरा जवान संतोष मोरे यांच्यावर शासकीय इतमात राकुसलेवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!