शेअर बाजारात किरकोळ घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, २४ : आजच्या व्यापारी सत्रात आयटी, ऊर्जा आणि आरआयएलच्या स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली. परिणामी भारतीय निर्देशांकांमध्ये घसरण झाली. निफ्टी ११ हजारांच्या पातळीपुढे राहिला, मात्र ०.१९% किंवा २१.३० अंकांनी घसरून तो ११,१९४.१५ अंकांवर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्सदेखील ०.०३% किंवा ११.५७ अंकांनी घसरला व ३८,१२८ अंकांवर विसावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की, आज जवळपास १५५७ शेअर्स घसरले, १०५५ शेअर्सनी आघाडी घेतली तर १४० शेअर्स स्थिर राहिले. आरआयएल (४.४०%), एचसीएल टेक (४.६९%), टेक महिंद्रा (३.५५%), सन फार्मा (२.१०%) आणि इन्फोसिस (१.४६%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर झी एंटरटेनमें (४.८४%), हिंडाल्को (३.४६%), अॅक्सिस बँक (३.२३%), एसबीआय (३.१८%) आणि गेल इंडिया (२.६४%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. आयटी आणि ऊर्जा क्षेत्र वगळता सर्व सेक्टरल निर्देशांकांमध्ये आज घसरण झाली. बीएसई मिडकॅप ०.५९% नी तर बीएसई स्मॉलकॅपदेखील ०.२३% नी घसरला.

एशियन पेंट्स : कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षातील पहिल्या तिमाहीत निव्वळ नफ्यात ६७% ची घसरण नोंदवली. तर कंपनीचा महसूल ४२.७% नी घसरला. परिणामी कंपनीचे स्टॉक्स ०.६३% नी घसरले व त्यांनी १,७१७.०० रुपयांवर व्यापार केला.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : कंपनीच्या अंशत: पेड शेअर्स आणि पूर्ण पेड शेअर्सचे एकत्रित बाजार भांडवलाने १४ लाख कोटींचा आकडा यशस्वीत्या ओलांडला. त्यामुळे हा आकडा पार करणारी ही पहिली भारतीय कंपनी ठरली आहे. कंपनीचे स्टॉक्स ४.४% नी वाढले व त्यांनी २,१४८.४० रुपयांवर व्यापार केला.

पीएनबी हौसिंग फायनान्स : पीएनबी हौसिंग फायनान्सचे स्टॉक्स ५% नी वाढले व त्यांनी २२०.६० रुपयांवर व्यापार केला. कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात घसरण होऊनही सलग दुस-या दिवशी शेअरचे मूल्य वधारले. कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीत एकत्रित नफ्यात ९.५% ची घट दर्शवली.

हिरो मोटोकॉर्प : कंपनीने अॅथर एनर्जीमध्ये ३४.५८% ची शेअर होल्डिंग घेत ८४ कोटी रुपयांची गुंतवणूक जाहीर केली. तथापि, कंपनीचे स्टॉक्स १.१६% नी घसरले व त्यांनी आजच्या व्यापारी सत्रात २,७३९.०० रुपयांवर व्यापार केला.

भारतीय रुपया : भारतीय रुपयाने आजच्या व्यापारी सत्रात काहीशी घसरण घेत अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.८२ रुपयांचे मूल्य कमावले.

सोने : आजच्या व्यापारी सत्रात सोने स्थिर राहिले. वाढत्या अमेरिका-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर गुंतवणूकदार महागाईला पर्याय शोधत असल्यामुळे पिवळ्या धातूसाठी सर्वोत्कृष्ट आठवडा ठरण्याचा काळ आहे.

जागतिक बाजार : कोरोना व्हायरसच्या रुग्णांची वाढती संख्या आणि तीव्र आर्थिक मंदीचे आडाखे यामुळे जागतिक बाजाराच्या ट्रेंडवर नकारात्मक व्यापार झाला. नॅसडॅकमध्ये २.२९%, निक्केई २२५ मध्ये ०.५८% आणि हँगसेंगच्या शेअर्समध्यये २.२१% ची घसरण दिसून आली. युरोपियन मार्केटनेही आज घसरणीचा व्यापार केला. एफटीएसई १०० चे शेअर्स १.१०% नी तर एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.३८% नी घसरले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!