दैनिक स्थैर्य | दि. ८ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
फलटण तालुका व आजूबाजूच्या तालुक्यांतील फार्मसी क्षेत्रात करिअर करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आता ठाकुरकी (ता. फलटण) येथे सर्व सोईसुविधांसह असलेल्या फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित ‘कॉलेज ऑफ फार्मसी अॅण्ड रिसर्च सेंटर’ या फार्मसी महाविद्यालयात २०२४-२५ या वर्षाकरीता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
या फार्मसी कॉलेजचा निगर्सरम्य कॅम्पस असून कॉलेजची सर्व सोईसुविधांसह भव्य इमारत आहे. अत्याधुनिक लॅब्रोरेटरी, प्रशस्त क्लासरूम, हर्बल गार्डन व भव्य लायब्ररी ही या कॉलेजची मुख्य वैशिष्ट्ये आहेत.
फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त, एमएसबीटीई, मुंबई संलग्नित तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरी संलग्नित बी. फार्म व डी. फार्म कोर्सेस येथे उपलब्ध आहेत.
फार्मसी क्षेत्रातील उज्ज्वल करिअरसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन ‘कॉलेज ऑफ फार्मसी अॅण्ड रिसर्च सेंटर’ या महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.