एकाचवेळी गुरू व शिष्याला सन्मानित करण्याचा वेगळा उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, कराड, दि. १९ : कराड येथील इनरव्हील क्लबने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून एकाचवेळी गुरू व शिष्याला सन्मानित करण्याचा वेगळा उपक्रम राबवला.

सन्मानित झालेले शिष्य म्हणजे नुकतेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेले व कराडचे नाव महाराष्ट्रामध्ये झळकविणारे बनवडीचे सुपुत्र प्रसाद चौगुले आणि गुरू म्हणजे त्यांना या परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे नांदेड येथील प्रा. मनोहर भोळे.

याप्रसंगी प्रसाद चौगुले, इनरव्हील क्लब ऑफ कराडच्या प्रेसिडेंट रूपाली डांगे, सेक्रेटरी सीमा पुरोहित, सदस्या डॉ. अर्चना औताडे उपस्थित होत्या.  प्रा. मनोहर भोळे यांनी ऑनलाइन उपस्थित राहून या सत्काराचा स्वीकार केला. कार्यक्रमात प्रा. मनोहर भोळे व प्रसाद चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले.

रूपाली डांगे यांनी प्रास्ताविक केले. नम्रता कंटक यांनी सूत्रसंचालन केले. सीमा पुरोहित यांनी आभार मानले. यावेळी क्लबचे सदस्य उपस्थित होते. 


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!