दैनिक स्थैर्य | दि. २५ जुलै २०२४ | फलटण |
फलटण नगर परिषदेतील सफाई कामगार मिथुन अशोक अहिवळे (रा. मंगळवार पेठ, फलटण) यांनी २५ वर्षांपासून भाडे भरत असलेली नगर परिषदेची सदनिका वापरण्यास मिळण्यासाठी फलटण नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
याबाबत माहिती अशी, महात्मा फुले कामगार वसाहत येथील फलटण नगर परिषदेची मालकीची सदनिका क्र. १५ ही सध्या नगर परिषदेत सफाई कामगार म्हणून काम करत असलेले मिथुन अशोक अहिवळे यांचे वडील अशोक खंडू अहिवळे यांना नगर परिषदेच्या मालकीची सदनिका क्र.१५ ही वापरणेस देण्यात आली होती. ती सदनिका सध्या दिलीप सदाशिव अहिवळे हे वापरत आहेत. माझ्या वडिलांच्या नंतर माझी आई सविता अशोक अहिवळे ही नोकरीस होती. माझ्या आईच्या पगारातूनही या सदनिकेचे घरभाडे २५ वर्षे आईच्या पगारातून कपात होत होते. त्यानंतर गेल्या चार वर्षांपासून आईच्या सेवानिवृत्तीनंतर सध्या सफाई कामगार म्हणून असलेले मिथुन अहिवळे हे घरभाडे भरत आहेत. मात्र, ही सदनिका त्यांना वापरण्यास देण्यात आली नाही. याबाबत त्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांच्याकडे वारंवार अर्ज करूनही त्यांना ही खोली मिळालेली नाही.
ही सदनिका मिळावी यासाठी २३ जुलैपासून सफाई कामगार मिथुन अहिवळे यांनी फलटण नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरू केले आहे.