स्थैर्य, मुंबई, दि.१९: डॉलरचे मूल्य सुधारत असल्याने कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली असून चीनकडून तेलाची मागणी वाढल्याने या दरांना आणखी आधार मिळण्याची शक्यता असल्याचे मत एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष श्री प्रथमेश माल्या यांनी व्यक्त केले. डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ०.७% नी घसरले असून साथीचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव दिसून येत असल्याने तेलाच्या दरांवर आणखी दबाव आला आहे.
सक्तीची उपाययोजना बंद झाल्यानंतर लिबियातील सर्वात मोठ्या तेल क्षेत्रातील प्रक्रिया सुरू झाल्याने जागतिक तेल पुरवठ्याची चिंता वाढली. तर मागणीतील उदासीनता ही डोकेदुखी कायम आहेच. साथीच्या आजाराने झालेल्या नुकसानामुळे कच्च्या तेलातील मागणीत फार सुधारणा होणार नसल्याचा अंदाज ओपेकने दर्शवला आहे.
काही कार्गोनीं अखेर जकात भरल्यानंत सप्टेंबर २०२० मध्ये चीनची कच्च्या तेलाची आयात १७.५ टक्क्यांनी वाढली व ती दररोज ११.८ दशलक्ष बॅरल एवढी नोंदली गेली. तसेच जगातील मोठ्या तेल ग्राहकांकडून मागणी वाढत असल्याने तेलातील नुकसानीला आळा बसला. अमेरिकेच्या एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनने अमेरिकी तेल साठ्यात ३.८ दशलक्ष बॅरलची घट झाल्याचे नोंदवले. त्यामुळेही तेलाच्या दरांना आधार मिळाला. तसेच अमेरिकेच्या नव्या कोरोना मदत विधेयकाच्या आशेने तेलाच्या दरांना आणखी मदत मिळण्याची शक्यता आहे.