दैनिक स्थैर्य | दि. २७ जून २०२३ | फलटण |
फलटणचे उपविभागीय अधिकारी श्री. सचिन ढोले यांच्या अध्यक्षतेखाली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत आढावा सभा संपन्न झाली.
या आढावा सभेसाठी तहसीलदार श्री. अभिजित जाधव, तालुका कृषी अधिकारी श्री. सागर डांगे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी श्री. नवनाथ फडतरे, मुख्य प्रबंधक व शाखा प्रबंधक बँक ऑफ महाराष्ट्र (लीड बँक) श्री. आकाश सिंह, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय विकास अधिकारी श्री. अजित निंबाळकर, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था प्रतिनिधी श्री. शेखर साळुंखे, वरिष्ठ प्रबंधक इंडियन पोस्ट पेमेंट बँक सातारा श्री. संतोष कुमार सिंह, कृषी अधिकारी श्री. प्रमोद जाधव, कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी व कृषी पर्यवेक्षक उपस्थित होते.
या सभेमध्ये उपविभागीय अधिकार्यांनी प्रलंबित पात्र लाभार्थ्यांचे ईकेवायसी, आधार सिडींग, लॅण्ड सिडींग पूर्ण करणे, मयत लाभार्थी याद्या ग्रामविकास विभागाने सादर करणे, लीड बँक, डीसीसी, आयपीपीबी यांनी आधार सिडींगचे काम पूर्ण करणे याकरिता ग्रामस्तरावर कॅम्पचे आयोजन करणे, ईकेवायसी आणि आधार सिडींगचे काम सर्व विभागांनी समन्वय ठेऊन लवकरात लवकर पूर्ण करावे, ईकेवायसी करिता ग्रामपंचायत स्तरावरील ऑपरेटर यांनी मदत करावी, इंडियन पोस्ट पेमेंट बँक मार्फत ग्राम स्तरावर कॅम्पचे आयोजन करून खाते काढणे, आधार सिडींग करणे, ईकेवायसी करणे, आधार आणि मोबाईल पे लिंक करणे याबाबत कार्यवाही केली जाईल, अशा सूचना केल्या.
सध्या या योजनेचा लाभ तालुक्यातील ५३८९१ खातेदार घेत आहेत.