जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०८ जुलै २०२३ । सातारा । जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची आढावा बैठक  जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली  जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.   या बैठकीस समाजकल्याणचे  सहायक आयुक्त  नितीन उबाळे यांच्यासह समितीचे इतर सदस्य उपस्थित होते.

यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अनुसूचित जाती व जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमान्वये पोलीस विभागाकडे दाखल झालेल्या व निपटारा झालेल्या तसेच तपासासाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा, न्यायालयाकडून निर्णय देण्यात आलेल्या तसेच प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा, अत्याचारांना बळी पडलेल्या व्यक्तींना देण्यात आलेल्या अर्थसहाय्य मंजूरी तसेच प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला.

ऐनवेळच्या विषयांमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व संघटक व आरपीआय जावली अध्यक्ष यांनी दिलेल्या निवेदन, उंब्रज पोलीस ठाण्यामधील पीडितांच्या पुनर्वसनाबाबत,  मांडवे ता. सातारा येथील रमाई आवास घरकुल तसेच न्यू इरा स्कूल पांचगणी ता. महाबळेश्वर येथील अनूसूचित जाती प्रवर्गातील कर्मचाऱ्यांच्या निवेदनावर सविस्तर चर्चा करुन सदर प्रकरणी योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी दिल्या.


Back to top button
Don`t copy text!