अतिरिक्त एमआयडीसीसाठी भूसंपादन करु नये यासाठी संंबंधित ग्रामस्थांचे प्रांताधिकार्‍यांना निवेदन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ नोव्हेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील मिरगाव, नांदल, ढवळेवाडी, या गावातील जमिनींचे अतिरिक्त एमआयडीसीसाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया सुरु आहे. परंतु या गावातील ग्रामस्थांची या भूसंपादनामुळे ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ येउ शकते. म्हणून हे भूसंपादन अथवा या जागेवर अतिरिक्त एमआयडीसी होउ नये, या मागणीचे निवेदन या गावातील ग्रामस्थांनी फलटणचे उपविभागीय अधिकारी यांचेकडे दिले आहे.

या गावातील सर्वच शेतकर्‍यांचे कुटुंब हे या जमिनीवर अवलंबून असून कुटुंबाकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्याचप्रमाणे या शेतजमिनीशी निगडीत असणारा दुग्ध व्यवसायही या परिसरातील शेतकररी करतात. परिसरातील सर्व शेती बागायती आहे. ही सर्व गावे नीरा देवघर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील आहेत. त्यामुळे येथील शेतकर्‍यांच्या तोंडचा घास काढू नये, अशी मागणी शेतकर्‍यांमधून करण्यात येत आहे.

या निवेदनावर फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. नरसिंह निकम, बजरंग गावडे, खंडेराव सरक, अशोकराव जाधव, विराज खराडे, युवराज शिंदे, विजय मायणे, शरद सोनवणे, तुकाराम गायकवाड, कृष्णात नेवसे, राजेंद्र नागटिळे, अशोक भोसले, सुशांत निंबाळकर, अमोल ससस्ते, प्रदीप झणझणे, किशोर सोनवणे यांच्या सह्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!