दैनिक स्थैर्य । दि. ३० ऑकटोबर २०२२ । सोलापूर । एकसंघ भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार पटेल यांची जयंती केंद्र शासनाच्या वतीने “एकतेचा उत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मध्य रेल्वे, सोलापूर विभाग आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने “राष्ट्रीय एकता दिवस” निमित्त सरदार से लोहपुरुष जीवनप्रवासाची माहिती देणाऱ्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनाचे दिनांक 30 व 31 ऑक्टोंबर 2022 या कालावधीत सोलापूर रेल्वे स्टेशन येथे आयोजन करण्यात आले आहे.
या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन सोलापूरचे खासदार मा.डॉ.जयसिध्देश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते 30 ऑक्टोंबर 2022, रोजी सकाळी 11.30 वाजता सोलापुर रेल्वे स्टेशनच्या चालू तिकीट खिडकीजवळ येथे करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दुहारे, पोलिस आयुक्त डॉ राजेंद्र माने, सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर आणि पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत हे प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत सर्वांसाठी विनामुल्य खुले राहणार आहे.
वल्लभभाई पटेल यांचे प्रारंभिक जीवन, वकिली कारकीर्द, राजकीय कारकीर्द, बारडोली सत्याग्रह ते सरदार, स्वातंत्र्यानंतरचा प्रवास, एकसंघ भारत निर्माणाचा प्रवास, कश्मीर, जूनागड़ आणि हैदराबाद सारख्या 565 संस्थानाचे भारतात विलीन करण्यासाठी केलेली कामगिरी आणि त्यांच्या अखेरच्या प्रवासा पर्यंतची महत्वपूर्ण माहिती चित्रमय आणि मजकूर रुपाने प्रदर्शनाच्या माध्यमातून नागरिकांना बघता येईल. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्यातील सरदार पटेल यांची भूमिका व राष्ट्रीय एकात्मेची भावना कायमस्वरूपी मनात राहावी व त्याचे संस्मरण व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी हे छायाचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
जास्तीत जास्त नागरिक, इतिहास अभ्यासक, संशोधक्, स्पर्धा परिक्षाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी छायाचित्र प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक शैलेश सिंह परिहार व केंद्रिय संचार ब्युरो, सोलापूरचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण यांनी केले आहे.
एकसंघ भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केंद्र शासनाच्या वतीने “एकतेचा उत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने जिल्हा प्रशासन, सोलापूर, जिल्हा क्रिड़ा अधिकारी, नेहरू युवा केंद्र संघटन आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या संयुक्त विदयमाने दिनांक 31 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 7.00 वाजता हुतात्मा चौक येथे जिल्हास्तरीय एकता दौड़चे आयोजन करण्यात आले आहे.
या दौड़ला जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडून हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे. यावेळी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, मनपा आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अधिकारी, कर्मचारी, पोलीस, जवान, शहरातील विविध सामाजिक व क्रिड़ा संस्था, विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत. एकता दौड़ मध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यानी केले आहे.