सातार्‍यातील बांधकाम व्यवसायिकाला सव्वा कोटींचा गंडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

परदेशी असल्याची बतावणी करणार्‍या 11 भामट्यांवर गुन्हा : गुंतवणूक करण्याचे दाखवले आमिष

स्थैर्य, सातारा, दि. 12 : जमीन व्यवहारात पैसे गुंतवण्याची हूल देवून परदेशी भामट्यांनी सातारा शहरातील बांधकाम व्यवसायिकाला तब्बल सव्वा कोटींचा गंडा घातला आहे. या भामट्यांनी 6 कोटी भारतीय मुल्यांचे युरो चलन आणल्याचा बनाव करून ते काळे प्रोसेस व केमिकलद्वारे ते पैसे त्याच्या मूळ फॉर्ममध्ये आणण्याची बतावणी केली. त्याद्वारे त्यांनी बांधकाम व्यवसायिकाकडून वेळोवेळी पैसे उकळले.

याबाबत सचिन घनशाम वाळवेकर यांनी सातारा शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोलोमन सिसो, पोटलाको थबांने, एडवर्थ स्मिथ, बेल्सन्स जॉर्ज, मॉरीस, जेम्स योयोबो (ईगेरे) मॉरीय गोल्डबन, मॉर्गन, सॅम, अल्फेड, डॉनीयल आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

फिर्यादीत म्हटले आहे की, फेब्रुवारी महिन्याअखेर त्यांना प्रिन्स सोलोमन सीसो या व्यक्तीचा फोन आला. त्याने भारत व आफ्रिकन देशामध्ये पंतप्रधान मोदींनी काही करार केले आहेत. त्यामुळे आम्ही भारतामध्ये गुतवणुकीसाठी आलो असून सातार्‍यामध्ये बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करायची करायची असल्याची बतावणी केली. त्याच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून सन 2018 मध्ये संबंधित व्यक्ति व पोटलांको थबाने दोघे आले. त्यांनी लीसोथो या देशातील मसेरू येथील रहिवासी असल्याचे सांगितले. ते फिर्यादीला सातारा येथे भेटण्यास आले. सोलोमल हा तेथील राज्याच्या सातव्या राणीचा लहान मुलगा व थबाने हा माजी पंतप्रधानांचा मुलगा असल्याचे सांगितले. त्यांचे पासपोर्ट दाखवल्याने फिर्यादीने त्यांच्यावर विश्‍वास ठेवला. तिघांनी सातार्‍यातील सदर बाजार व वाढे फाटा या ठिकाणी जागा पाहिल्या. या जागा पसंत करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्याचे संशयीतांनी फिर्यादी वाळवेकर यांना सांगितले.  त्याप्रमाणे जागा व प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्यांना दाखविले. नंतर सदरबाजार येथील एक जागा फायनल करण्यात आली. 

यावेळी त्यांना जे पैसे गुंतवायचे आहेत ते रोख रक्कम स्वरुपात असल्याचे सांगितले. हे पैसे प्रिन्स सोलोमनच्या वडिलांनी त्याच्या साठी स्विस बँकेमध्ये सुरक्षित ठेवल्याचे सांगितले व त्यातील 24 कोटी भारतीय मुल्यांचे युरो त्यांनी गुंतवणुकीसाठी आणल्याचे संगितले. त्यांनी स्विस बँकेचे पत्र व संबंधित कागदपत्रेही दाखविली. गुंतवणुकीतील 40% फायदा वाळेवेकरना देण्याबाबतचे करार पत्र देखील त्यांनी आणले होते.  नंतर पैसे आणण्यासाठी ते परत मुंबईला गेले. दि. 10 मार्च 2018 रोजी सातारा येथे आले. येताना सोबत एक पेटी घेऊन आले. त्या पेटीमध्ये 6 कोटी भारतीय मुल्यांचे युरो असल्याचे त्यांनी संगितले. प्रत्यक्षात दाखवताना त्यांनी त्यातले खाकी पेपर दाखवले. हे पेपर हे युरो असल्याचे स्विस बँकेचे पत्र दाखवले. जगभरातील राजे राजवाडे तसेच मोठे राजकीय व्यक्ति याच प्रकारे पैशांची देवाण घेवाण करतात, असे पत्र होते. ट्रान्सपोर्टेशनसाठी त्याचा फॉर्म बदललेला असतो व एका विशिष्ट प्रोसेस व केमिकलद्वारे ते पैसे त्याच्या मूळ फॉर्ममध्ये येतात असे संगितले. त्या साठी दोन खाकी कागदांमध्ये (प्रोसेस्ड युरो) ओरिजनल युरो टाकल्यानंतर त्याला केमिकलने काळे करून 2 तास तसेच ठेऊन नंतर दुसर्‍या एका विशिष्ट केमिकलने स्वछ करून ते युरो फिर्यादीला दाखवले. त्यानंतर त्या प्रोसेसला 1 कोटीचे भारतीय मुल्यांचे युरो लागणार असल्याचे संगितले. त्यांनी ती पेटी फिर्यादीकडे ठेवली व जाताना 50 हजार रोख घेवून गेले. त्यानंतर बर्‍याचवेळी त्यांनी पैसे तयार करण्याबाबत फोन केला. त्यांना मुंबईला भेटण्यासाठी हॉटेल ताजला बोलविले. तेथे त्यांनी बर्‍याच गोष्टी सांगून विश्‍वास संपादन केला. त्यामुळे फिर्यादीने मार्च 2018 मध्ये 45 लाखांची जमवाजमव केली व मेव्हणे सुशिल क्षत्रीय यांच्यासह 26 मार्च 2018 रोजी मुंबईत ताज हॉटेल परीसरातील फॉरेन एक्सचेंज ऑफीसमध्ये गेले. तेथे 500चे युरो 110 नग घेतले. तेव्हा फिर्यादीने दोघांना 1 लाख दिले व दि. 27  मार्च 2018 रोजी आम्ही चौघेजण सातारा येथे आले. त्या दोघांनी फिर्यादीकडील पेटीतील 110 खाकी कागद काढले व ते एका बादलीमध्ये टाकले व त्यावर तपकिरी रंगाचे केमिकल टाकले व थोडया वेळाने ते सर्व खाकी पेपर बाहेर काढुन सतरंजीवर वाळत ठेवले. नंतर दोन खाकी कागदांमध्ये फिर्यादीजवळ असलेला ओरीजनल 500चा एक युरो असे त्याचे जवळचा असलेला खाकी कागद असे एकामागे एक असे एकत्रित केले व तो तयार झालेला बंडल काळ्या पोलीथिनच्या पिशवीत काळ्या स्टील ग्रिपचा टेप लावून बंडल तयार केला व तो बंडल त्याच पेटीत टाकून पेटी फिर्यादीकडे दिली. दुसर्‍या दिवशी ते युरो केमिकलने साफ करण्याचे आश्‍वासन दिले व ते दोघे मुक्कामी हॉटेल महाराजा सातारा येथे थांबले. दुसर्‍या दिवशी सकाळी साधारण सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान सोलोमनने फोनवरून सांगीतले की युरो साफ करायचे केमिकल उडुन गेले आहे व ते युके एमबसी दिल्ली येथून आणण्यासाठी आम्ही दोघे दिल्लीला जात आहे. केमीकलसाठी पैसे लागतील असे सांगून संबंधित व्यक्तीचे नावे व खाते क्रमांक पाठवले. त्यामध्ये दि. 30 मार्च 2018 रोजी एटीएम मशीन प्रतापगंज पेठ येथून साकीर अली खाते (नोएडा) याच्या खात्यावर 48 हजार व दि. 1 एप्रिल 2018 रोजी त्याच खात्यात 2 लाख 2 हजार पाठविले. त्याचदिवशी रोजी एका खात्यात 64 हजार पाठविले. त्याच खात्यात दि 5 एप्रिल 18 रोजी 1,05,000 व दि 7 एप्रिल 2018 रोजी 1,05,000 पाठविले. दि 13 एप्रिलला नदीम खानच्या दिल्लीतील खात्यात आरटीजीएसने दोन लाख पाठवले व रोख स्वरूपात दोन लाख एटीएम मशीन व्दारे पाठविले. नंतर दि. 24 एप्रिल 2018 रोजी रविकुमार एटरप्रायझेसच्या विभुतीखंड लखनउ खात्यात 49 हजार 500 पाठविले. नंतर दि 25/4/18 रोजी सुरज शिंदेच्या खात्यात 1,50,500 पाठविले. दि. 26/4/18 रोजी आशीफ खानच्या पंजाब नॅशनल बँक सरीता विहार दिल्लीचे खातेवर 1,60,000 रू पाठविले. दि. 21/5/18 रोजी रिया एंटरप्रायजेस कोटक बॅक गुडगांव खाते क 6711 9 47016 वर 2,50,000 रू पाठविले. हे सर्व पैसे हे सोसोमन आणि थबाने यांनी केमीकल आणण्यासाठी वरील सर्व केमीकल ऐजंट असल्याचे सांगून एक-एक कारणे सांगून घेतले. 

सोलोमन फसवत असल्याचे लक्षात आल्या नंतर त्याला पैसे देणे बंद केले. त्यांनतर केमिकल शोधण्यासाठी फिर्यादीने इंटरनेटवरती सर्च केला. व एडवर्ड स्मिथ कंपनीकडे संपर्क केला. स्मिथ यानेही मॉरीस आणि जॉर्ज या सहकार्‍यासंह दहीसर रेल्वे स्टेशनवर भेटलो असता त्यांना मी माझे सोबत घडलेला प्रकार सांगीतला तेव्हा मॉरीस  घेतली. त्यानंतर जॉर्जने फिर्यादीच्या सातारा येथे घरी येवून नोटांवरती पावडर व केमिकल टाकले.  आणखी एक लिटर 30 लाखांचे केमिकल लागेल असे सांगितले. या बहाण्याने त्यांची त्याच पद्धतीने पुन्हा फसवणूक केली. 

यानंतर वेळोवेळी युरोचे काळे झालेले पैसे परत स्वच्छ करून देतो, अशी बतावणी करून सोलोमन सिसो, पोटलाको थबांने, एडवर्थ स्मिथ, बेल्सन्स जॉर्ज, मॉरीस, जेम्स योयोबो (ईगेरे) मॉरीय गोल्डबन, मॉर्गन, सॅम, अल्फेड, डॉनीयल यांनी मार्च 2018 पासून ते 15 नोव्हेंबर 2018 पर्यंत काळे झालेले पैसे स्वच्छ करून देतो, असे म्हणुन वेळोवेळी पैशाची मागणी करून 1 कोटी 27 लाख 46 हजार रूपयांची फसवणूक केली असल्याचे फियार्दीत म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!