दैनिक स्थैर्य । दि. ०१ ऑगस्ट २०२२ । कराड । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त स्वच्छ व पारदर्शक वातावरणात होण्याच्या दृष्टीने तसेच मतदानाची टक्केवारी वाढण्याकरिता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रात 4 ऑगस्ट 2022 रोजी सार्वजनिक सुट्टी खालील अटींच्या अधीन राहून जाहीर केली आहे.
ग्रामपंचायतीच्या निवडणूक क्षेत्रातील सर्व दुकाने आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्नगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या शॉपिंग सेंटर्स, माँल्स रिटेलर्स इ. या आस्थापनांमधील कामगारांना गुरुवार दिनांक 4 ऑगस्ट 2022 रोजी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.
मतदानाच्या दिवशी खालील नमूद ग्रामपंचायतींच्या निवडणूक क्षेत्रात कामगाराच्या अनुपस्थितीमुळे धोका अथवा मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल अशा आस्थापनेतील, निवडणूक क्षेत्रातील उद्योगातील कामगार तसेच माहिती तंत्रज्ञान कंपन्या, निर्यात व्यवसायात असलेल्या कंपन्या कायम, अखंडित उत्पादन सुरू असलेल्या कंपन्यांमधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन तासांची विशेष सवलत देण्यात येत आहे.