गाने अन जाने युगल गीतांचा आज साताऱ्यात कार्यक्रम


दैनिक स्थैर्य । दि.०६ मार्च २०२२ । सातारा । दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित.सातारा व कराओके सिंगर्स क्लब,सातारा.यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक.6 मार्च 2022 रोजी सायंकाळी 5.30 वाजता दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था हॉल कन्याशाळा पाठीमागे “गाने अनजाने” मधुर युगल हिंदी गीतांचा कार्यक्रम. आयोजित केलेला आहे. सदर कार्यक्रम सातारा शहरातील संगीत प्रेमी रसिकांसाठी ठेवलेला आहे. या कार्यक्रमात सातारा कराओके सिंगर क्लबचे पुढील कलाकार गायन करणार आहेत.

सौ स्मिता शेरकर, सौ. सुप्रिया चव्हाण, सौ. संगीता हेंद्रे, सौ. गीतांजली पाटील, सौ. दुर्गा पुरोहित, सौ. रमीजा सय्यद, सौ. नीलम कुलकर्णी, कु. ऐश्वर्या गव्हाणे, राजेंद्र पाटील, श्री विकास साबळे, श्री सुधीर चव्हाण, प्रवीण जाभंळे, अजय घोरपडे, सागर जामदार, किरण अडागळे, ध्वनी व्यवस्था श्री सचिन शेवडे तरी सातारा शहरातील रसिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!