स्थैर्य, सोलापूर, दि.22 : कोरोना विषाणूने बाधित झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी शहर आणि जिल्ह्यातील दवाखाने ताब्यात घेण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली.
ज्य शासनाच्या आरोग्य विभागाने काल खासगी रुग्णालया संदर्भात अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार खासगी दवाखान्यातील रुग्ण्सेवेचा महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायद्यात समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींवर उपचारासाठी दवाखाने ताब्यात घेण्याचे अधिकार प्रशासनाला जिल्हा प्रदान करण्यात आले आहेत. या आदेशानुसार जिल्हाधिकारी शहर अथवा जिल्ह्यातील कोणतेही हॅास्पिटल उपचारासाठी ताब्यात घेऊ शकतात. याबाबत सोलापूर शहरासाठी सोलापूर महापालिकेचे आयुक्त यांना प्राधिकृत करण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले.