दैनिक स्थैर्य । दि. १६ जानेवारी २०२३ । फलटण । मकर संक्रांत रोजी 4 ते 5 दरम्यान फलटणच्या कुंभार वाड्यात आवा लुटण्यात आला.
आवा लुटण्यासाठी श्रीकृष्ण मंदिर येथून सुनील मठपती यांच्या सह शंभर ते सव्वाशे महीला वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत कुंभार वाड्यात दाखल झाले.
त्यानंतर आव्याचे पूजन करण्यात आले आवा लावणारे बाळासाहेब रघुनाथ कुंभार यांना पुर्ण पोशाख करण्यात आला.
महिलांनी एकमेकींना सौभाग्याचे लेणे लेऊन “तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला” चा संदेश देऊन शुभेच्छा दिल्या.
हा आवा केलेला नवस फेडण्यासाठी रचला जातो व त्याची विधीवत पूजा करून तो लुटला जातो. या आव्यामध्ये राजंण, डेरे, कुड्यां, बारीक गाडगी, गुडंग्या, पणत्या असे मातीपासून तयार केलेल्या वस्तू रचून ठेवतात व त्या लुटल्या जातात आवा लुटण्यासाठी महीलांची झुंबड उडते.
आवा लुटल्यानंतर लुटलेल्या वस्तू डोक्यावर घेऊन वाजत गाजत घरी घेऊन महीला गेल्या. कुंभार वाड्यात महीलांची फार गर्दी झाली होती बर्याच वर्षांनंतर हा आवा लुटण्यात आला आहे.