स्थैर्य, सातारा, दि. 02 : सातारा जिल्हा पोलिस दलातील शिरवळ पोलीस ठाण्यात सध्या कर्तव्य बजावणाऱ्या फौजदाराला क रोना ची लागण झाली असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे .सातारा पुणे जिल्ह्याच्या बॉर्डरवर चेक पोस्टवर अनेक वेळा या लागण झालेल्या अधिकाऱ्याने आपले कर्तव्य बजावले होते. त्यातून त्यांना लागण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेमुळे शिरवळ पोलीस ठाण्यात व जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
संबंधित फौजदार हे मूळचे पुणे जिल्ह्यातील असून शिरवळ पोलीस ठाण्यात त्यांची पहिली पोस्टिंग आहे सध्या ते पत्नीसोबत सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे वास्तव्यास आहेत. शिरवळ चेक पोस्टवर करोना बाबत ये-जा करणाऱ्या लोकांची तपासणी केली जाते. त्यामुळे ट्रॅव्हल हिस्टरी असणाऱ्या सोबत या पोलिसांचा अधिकाऱ्यांचा संबंध येत असतो.
रविवारी शिरवळ चेकपोस्टवर पोलीसांचे घशातील स्त्राव घेण्यात आले .सोमवारी रात्री उशिरा त्यांचे अहवाल प्राप्त झाल्यावर त्यामध्ये या फौजदारा चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि उर्वरित रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. फौजदार यांचा रिपोर्ट पॉजिटिव आल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
दरम्यान संबंधित फौजदार यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवुन शिरवळ पोलीस ठाण्यातील काही पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.