दादासाहेब फाळके चित्रनगरीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा देण्यासाठी आराखडा तयार करावा – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.२० जानेवारी २०२२ । मुंबई ।  गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठीबरोबरच विविध भाषांतील सिनेमा, मालिका, जाहिरात, वेबसिरीज, माहितीपट यांचे चित्रीकरण सुरु असते. येणाऱ्या काळात चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबतचा आराखडा दादासाहेब फाळके चित्रनगरीमार्फत तयार करण्यात यावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.

आज दादासाहेब फाळके चित्रनगरी येथे महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे, सहव्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

श्री. देशमुख म्हणाले, चित्रनगरीत चित्रपट निर्मात्यांसाठी चित्रीकरणपूर्व आणि चित्रीकरणानंतरच्या प्रक्रियेकरिता (Pre-Production and Post-Production) एका ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त स्टुडिओ निर्माण करणे आवश्यक आहे. हे सर्व एकाच ठिकाणी कसे करता येऊ शकेल याबाबत दोन कंपन्यांनी यावेळी सादरीकरण केले. या कंपनीने सादर केलेल्या सादरीकरणानंतर यातील बाबींचा विचार करुन चित्रनगरीत सुसज्ज आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्टुडिओ उभारण्याबाबतचा आराखडा तयार करण्यात यावा.


Back to top button
Don`t copy text!