
दैनिक स्थैर्य | दि. १९ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
विडणी (ता. फलटण) गावच्या हद्दीत कोकरे वस्तीजवळ शनिवारी रात्री १० वाजता गायींना कत्तलीसाठी घेऊन जाणारी महिंद्रा पिकअप गाडी फलटण ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विडणी, तालुका फलटण गावचे हद्दीत कोकरे वस्ती येथे रमजान इमाम शेख (वय ५५, राहणार आसू, तालुका फलटण), बाळू मारुती शेडगे (वय ४५, राहणार तामखडा, तालुका फलटण) व इब्राहिम सैफन शेख (वय ३५, राहणार सरडे, तालुका फलटण) हे तिघेजण महिंद्रा पिकअप गाडी (क्रमांक एम एच ११ बी एल ०४४९) मध्ये दोन कालवड व एक गाय अशी एकूण गोवंश जातीची तीन जनावरे यांना चारापाणी याची कोणत्याही प्रकारची सोय न करता कमी जागेमध्ये उभी करून कत्तल करण्यास घेऊन जात असताना मिळून आले. या प्रकरणी पोलीस नाईक हरिदास दराडे यांनी फिर्याद दिली आहे.
या प्रकरणी रमजान शेख, बाळू शेडगे व इब्राहिम शेख या तिघांविरुद्ध पोलिसांनी जनावरांचा छळ, गोवंश हत्या बंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार अडसूळ करत आहेत.