
दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२३ | फलटण |
काही काही व्यक्ती कमालीच्या सोशिक व तितक्याच धीरोदत्त असतात. आयुष्यातील कोणताही प्रसंग असो, अशा व्यक्ती अत्यंत शांतपणे प्रसंगाला सामोरे जातात. प्रतिकूल परिस्थितीतही आनंदी वृत्ती ठेवून जगण्याची कलाच त्यांना साध्य झाली आहे, असे म्हणाल्यास हरकत नाही. जगणं जगणं म्हणतात ते यालाच! जगण्याची ही कला विवेकादनगरमधील सौ. प्रभा चंद्रशेखर हेन्द्रे यांनी आत्मसात केली आहे.
आपण केव्हाही जा, या व्यक्तीकडून तुमचं स्वागत होणारंच. कारण कितीही चिंता, व्याप, काम असले तरी ते त्यावेळी विसरण्याचे कसब त्यांनी साध्य केले आहे. आपल्या अडचणी, व्यथा बाजूला ठेवून दुसर्यांच्या मदतीला धावून जाण्याची परोपकारी वृत्ती त्यांनी कसोशीने जपली आहे. सर्वांशी सामाजिक भावनेने वागतात, म्हणूनच फलटण शहरात त्या लोकप्रिय आहेत.
अशा लोकप्रिय, समाजसेवी, परोपकारी सौ. प्रभा हेन्द्रे यांचा वाढदिवस! त्यानिमित्त सौ. प्रभा हेन्द्रे यांना लाख लाख हार्दिक शुभेच्छा!