दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । मुंबई । ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. उद्धव ठाकरेंनी यावेळी फडणवीसांचा उल्लेख लाचार गृहमंत्री असा केला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. घरी बसून राजकारण करणाऱ्या व्यक्तीनं मला शिकवू नये. नाहीतर मी बोलायला लागलो तर तुमची पळता भुई थोडी होईल, असं फडणवीस म्हणाले.
४५ एकर जमीन त्वरित विकणे आहे
फलटण - सातारा रोडवर मलवडी गावाच्या
रस्त्यालगत, निसर्गरम्य, वीज, पाणी असलेली
प्रदूषणमुक्त ४५ एकर जमीन योग्य किमतींस
त्वरित विकणे आहे.
संपर्क : 8888006611 (WhatsApp)
“उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलेल्या फ्रस्ट्रेशनला खरंतर उत्तर द्यायची काहीच गरज नाही. त्यांच्यापेक्षा खालच्या भाषेत मलाही बोलता येतं. मी नागपूरचा आहे हे त्यांनी लक्षात घ्यावं. पण मी खालची भाषा वापरणार नाही. एकच सांगेन मला बोलायला लावू नका नाहीतर तुमची पळता भुई थोडी होईल. मोदींचा फोटो लावून निवडून आले आणि खुर्चीसाठी कुणी लाचारपणा केला हे महाराष्ट्राला माहित आहे. कोरोनाकाळात घरी बसून राजकारण करणाऱ्यांनी मला शिकवू नये”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चाणक्यांच्या वाक्याच्या दिला दाखला
“चाणक्य यांचं एक चांगलं वाक्य आहे. राज्यातील चोर, डाकू, लुटेरे जेव्हा राजाच्या विरोधात बोलतात तेव्हा समजून जायचं की राजानं योग्य काम सुरू केलं आहे. मी काही राजा नाही. पण डाकू, लुटेऱ्यांची बडबड सुरू झाली आहे. मी याआधीही पाच वर्ष राज्याचं गृहमंत्रीपद सांभाळलं आहे. आता काहींना मी गृहमंत्रीपदी नकोय म्हणून अनेकांच्या पोटात दुखतंय. राज्यात जो जो चुकीचं काही करेल आणि कारवाईस पात्र असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही”, असं फडणवीस म्हणाले.
उद्धव ठाकरे काय म्हणाले?
ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांना शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांकडून झालेल्या मारहाण प्रकरणी उद्धव ठाकरे यांनी आज गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. जनतेशी प्रामाणिक राहून गृहमंत्री फडणवीस यांनी तातडीनं राजीनामा द्यायला हवा. महिलांचा सन्मान हे काही नुसतं बोलून होत नाही. उगाच फुकाच्या यात्रा काढू नका. तुमच्यात जर आरोपींवर कारवाई करण्याची हिंमत नसेल तर राजीनामा द्या, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.