
दैनिक स्थैर्य | दि. ६ ऑगस्ट २०२४ | फलटण |
साखरवाडी (ता. फलटण, जि. सातारा) गावच्या हद्दीत सात सर्कल येथील मारुती मंदिरासमोर फिर्यादी संतोष दगडू काटे (वय ४५, राहणार सात सर्कल, साखरवाडी) यांना दि. २८ जुलै २०२४ रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास फोन करून बोलवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच दगड, कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत फिर्यादी संतोष काटे हे जखमी झाले असून त्यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात मारहाण केल्या प्रकरणी सागर दत्तात्रय कारंडे (राहणार साखरवाडी, सात सर्कल, ता. फलटण, जि. सातारा) यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक फौजदार हजारे करत आहेत.