दैनिक स्थैर्य । दि. १५ सप्टेंबर २०२२ । फलटण । फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरुन एकास सहा जणांनी मारहाण केल्याची घटना दि. 12 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी अद्याप कोणाला पोलिसांनी अटक केलेली नाही.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बाळू बाबूराव माने याने दिलेल्या फिर्यादीनुसार काल झालेले भांडण मिटवायचे आहे. बबलू बाळू यादव, दत्ता संजय यादव, पप्पू ज्ञानेदव यादव, छोटय़ा संजय यादव, बक्या बाळू यादव, संजय यादव सशर्व रा. कुरवली यांनी पत्नी, मुलांना मारहाण केली. बाळू माने याच्या नाकावर दांडक्याने मारहाण केली. त्यामध्ये ते जखमी झाले असून याचा तपास हवालदार कर्णे हे करत आहेत.