
दैनिक स्थैर्य । दि. ३१ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सातारा जिल्हा रुग्णालयांमध्ये तात्काळ अतिदक्षता विभागातील उपचार न मिळाल्यामुळे बसप्पा पेठेतील एका रिक्षा चालकाला जीव गमावण्याची वेळ आली या प्रकरणामुळे संबंधितांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागण्याचा पवित्रा घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे मात्र जिल्हा रुग्णालयात असणाऱ्या शिकाऊ डॉक्टरांमुळेच रुग्णाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी बसप्पा पेठेतील श्याम सिंह परदेशी हे रिक्षाचालक असून त्यांना लिव्हर सोरायसिस चा त्रास होता त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे दिनांक 26 रोजी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र रात्री ड्युटीवर हजर असणाऱ्या नर्सने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून घेता त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करून केवळ सलाईन लावले परदेशी यांना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांचे ऑक्सिजन लेवल 92 वर आली होती त्यामुळे त्यांना तात्काळ ऑक्सिजन लावणे गरजेचे असते असे असतानाही त्यांना तात्काळ उपचार न मिळाल्याने गुरुवार दिनांक 27 रोजी त्यांचा सकाळी मृत्यू झाला.
या प्रकारामुळे परदेशी कुटुंबीयांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे आणि जिल्हा रुग्णालयाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे .रुग्णाच्या नातेवाईकांनी सांगितले की रात्री चार वेळा नर्सला बोलावून त्यांना ऑक्सिजन लावा असे सांगावे लागले मात्र ते कोणतेही सहकार्य रुग्णालयांकडून मिळाले नाही तसेच रात्रपाळीसाठी सुद्धा तेथे शिकाऊ डॉक्टरच उपलब्ध होते त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये परदेशी यांना तज्ञ डॉक्टरचे उपचार मिळू शकले नाहीत त्यामुळेच त्यांना जीव गमवावा लागल्याचा आरोप त्यांनी केला यासंदर्भात पालकमंत्री शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी ऋचेश जयवंशी आणि जिल्हा शिल्लक चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्याकडे संबंधित नातेवाईक तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातला सावळा गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे रात्रीच्या वेळी एमडी अर्हता प्राप्त तज्ञ डॉक्टर उपलब्ध असणे गरजेचे असताना रुग्णालयात मात्र डॉक्टर उपलब्ध न होणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.