
दैनिक स्थैर्य । दि. १७ ऑक्टोबर २०२२ । फलटण । बिबी.ता.फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सांस्कृतिक भवन त्याच्या पाठीमागे तलाठी ऑफिसच्या नविन बांधकामाचा भुमीपूजन समारंभ मान्यवरांच्या हस्ते नुकताच संपन्न झाला.
यावेळी बिबी गावचे सरपंच प्रीती काशीद उपसरपंच सचिन बोबडे आणि त्यांचा सर्व सदस्य स्टाफ. गावचे पोलीस पाटील अजित बोबडे सोसायटी सदस्य चंद्रकांत राजाराम बोबडे व गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.