
स्थैर्य, मुंबई, दि.९: ‘चला हवा येऊ द्या’ फेम प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरेचा चोरी गेलेला मोबाईल मुंबई पोलिसांनी परत केला आहे. कोरोना काळात मुंबई पोलिसांनी झोन १२ च्या हद्दीत मराठी अभिनेता भारत गणेशपुरे यांच्यासह ३१२ जणांचा मोबाईल चोरणा-या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.
या मोबाईल चोरांना पकडण्यासाठी सर्कल १२ चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोरीचा मोबाईल शोधण्यासाठी आणि चोरट्यांसमवेत मोबाईल जप्त करण्यासाठी एक विशेष पथक तयार केले आहे. अभिनेता भरत गणेशपुरे यांनी मोबाईल चोरल्याची तक्रार समतानगर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत झोन १२ डीसीपी डॉ. डी. स्वामी यांनी भारत गणेशपुरेसह ३१२ जणांचे चोरी गेलेले मोबाईल परत केले आहेत.